Wednesday 18 December 2013

Mother Chandika Spiritual Currency 

( http://www.chandikacurrency.com )

On the auspicious day of Dattajayanti 16th December 2013, Sadguru Shri Aniruddha Bapu launched the Mother Chandika Spiritual Currency website for his shraddhavan friends. One of the best gifts from our beloved Sadguru, our Dad !!!


Below is what Sadguru Shri Aniruddha Bapu says about this system,

I am starting Mother Chandika Spiritual Currency for everyone who is related to me as my friend. Tulasipatra would be the basic unit of this currency which is spiritual by nature. 
The system would consider and encompass various aspects of you like, regularity and involvement in the seva and bhakti that you perform. The system would also include other aspects of you like, participation in community prayers (sanghik upasana), level-headed and composed behavior, the efforts that you put to improve your own self. Tulasipatras corresponding to these factors would be awarded to you...

The registration process is very simple and user-friendly. I am sure that every shraddhavan would be desperate to get registered with it.



Below are few screenshots of the website....


Friday 9 August 2013

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका जयमाला शिलेदार ज्यांचे गुरुवारी ८ ऑगस्टला निधन झाले, त्यांचावर परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी ५ ऑगस्ट २००९ रोजी लिहिलेला लेख, जो आजच्या प्रत्यक्षमध्ये पुन्हा प्रकाशित केला आहे. 

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो

Monday 5 August 2013

Bharateey Prachin Balavidya (Marathi)

गेली अनेक वर्षे ’भारतीय प्राचीन बलविद्ये’ चे संशोधक- मार्गदर्शक व तज्ञ प्रशिक्षक म्हणून डॉ. अनिरूध्द धैर्यधर जोशी (अनिरूध्द बापू) (एम.डी.- मेडिसिन) कार्य करित आहेत. एक यशस्वी र्‍ह्युमॅटोलॉजिस्ट असलेल्या डॉ. अनिरूध्दांनी आपल्या अनेक वर्षांच्या व्यासंगाने संपादित केलेले भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रकार त्यांनी आता सर्वांकरिता खुले केले आहेत. ’भारतीय प्राचीन बलविद्या’ हा विषय त्याच्या नावावरुन गूढ वटतो, ज्याचे कुतूहल व आकर्षण शतकानुशतके विदेशी लोकांनाही वाटत आले आहे. जोपर्यंत ह्या भारतीय प्राचीन बलविद्येचा आपल्या देशात आदर केला जात होता तोपर्यंत भारतदेशही वैभवाच्या शिखरावर होता. ह्या देशातील तरुणांना ह्या प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षण जात्याच मिळत असल्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोण्त्याही शत्रुदेशाची हिंमत नव्ह्ती. पुढे कालौघात ह्या बलविद्यांचे आमच्या देशातील महत्व कमी कमी होऊन त्या हळूहळू लोप पावल्या अ त्यानंतर भारतदेश विदेशी आक्रमकांच्या तावडीत गेला. आज त्याच लोप पावलेल्या भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रथम आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर ह्यांना बापूंनी ही सर्व भारतीय प्राचीन बलविद्या स्वत: शिकवली. आता डॉ. अनिरूध्दांच्या मार्गदर्शनाखाली व आचार्य रविंद्रसिंहांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ह्या भारतीय प्राचीन बलविद्याचे प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. डॉ. अनिरूध्दांनी आचार्य रविंद्रसिंहांना दिलेल्या प्रशिक्षणवरुन व ह्या प्रशिक्षणवर्गात शिकवल्या जाणार्‍या बलविद्येच्या प्रकारांवरुन हे पुस्तक (टेक्स्टबुक) संकलित करण्यात आलेले आहे. 

हे पुस्तक ऑन लाइन खरेदी करण्यासाठी कृपया खालील साईट वर संपर्क करा.

http://www.aanjaneyapublications.com/  
परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०१.०८.२०१३)

॥ हरि ॐ ॥

रामनाम Bank अहवाल : अकाउंट १ लाख ६९ हजार, राम नाम जप ३२ अब्ज, एकूण जपसंख्या : ४९ अब्ज,२९ कोटी,२४लाख,२५ह्जार
अंजनामाता वही जपसंख्या : २४कोटी,५५लाख

आज आपण आधी मागच्या वेळेस ज्याबद्दल बोललो ते बघायचे आहे. π = २२/७ हे आपण बघितले. कुठल्याही circle चा circumference / diameter हा ratio नेहमी कायम (constant) असतो. π ही एक जबरदस्त शक्ती आहे. हा π भारतीय संस्कृतीत त्रिविक्रमामध्ये चिन्हांकीत केलेला आहे. आज आपल्याला बघायचे आहे हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आपल्या जीवनात काम कसे करते. ही एक विराट चेतना आहे. ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छ करू शके।
आपण ब्रह्माण्ड शब्द ऐकतो. हे circle आहे. दुसरा शब्द कालचक्र, हे पण circle आहे. तिकडेपण हा π काम करतो.

मनुष्याच्या शरीरात वर्तुळाकार असलेली गोष्ट कोणती? डोळ्यातील बाहुली (iris) ही Circular आहे. ज्याने आपण जगाला बघतो, ऒळखतो, देवाचे दर्शन घेतो तो दरवाजा वर्तुळाकार आहे. त्यामधील जी बाहुली (pupil) पण Circular आहे ही प्रकाशानुसार adjust होत असते. म्हणजेच प्रकाश आत घेणारी संस्था Circular आहे. म्हणजेच हे सर्व π च्या वर्चस्वाखाली आहे. इथे प्रभाव, सत्ता आहे त्रिविक्रमाची.

शरीरातील दुसरी वर्तुळाकार असलेली गोष्ट - नाभी (umbilicus) देखील Circular आहे. ही नाभी आईशी जोडलेली असते. हे विश्व आदिमातेने निर्माण केले. हे सर्व ब्रह्माण्ड आदिमातेमध्येच आहे. या आदिमातेच्या गर्भाशयातून कुणीही कधीही बाहेर पडू शकत नाही. काही झालं तरीही मी तिच्या गर्भातच राहतो, हा विश्वास पाहिजे. आम्हाला माहिती पाहिजे कितीही मोठे संकट असले तरीही आम्ही तिच्या गर्भातच राहतो. वाईट माणूसपण तिच्या गर्भातच राहतो.

आदिमातेकडून येणारी नाळ म्हणजे आईचं प्रेम म्हणजे वात्सल्य, म्हणजेच तिची कृपा. बाळाकडून म्हणजेच प्रत्येक मनुष्याकडुन त्या placenta through जाणारी रक्तवाहिनी गोष्ट म्हणजे श्रद्धा व विश्वास. ती सदैव कृपा करण्यासाठी आतुर असते पण प्रत्येकाला कर्मस्वातंत्र्य आहे. जर बाळाने नाळ कापायची ठरवलं तर तिची कृपा आम्हाला कशी मिळणार?

माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते ह्याचा अर्थ कळला का राजांनो?
म्हणजेच श्रद्धा व सबुरी कापली तर कृपाही नाही मिळणार. आपणच कात्री घेऊन कापत असतो म्हणून तिची कृपा आपल्याला मिळत नाही. ज्या प्रमाणात श्रद्धा त्या प्रमाणात कृपा. तुमच्याशी शत्रुत्व घेणारा मनुष्य, जर त्याची श्रद्धा जास्त असेल तर त्याच्यावर कृपा जास्त. श्रद्धा आणि विश्वास ही सख्खी भावंडं आहेत. आम्ही भगवंताची प्रार्थना करताना कायम रडगाणी गातो. तुम्ही तुमचा विश्वास व्यक्त करता जेव्हा तुम्ही तिची स्तुती करता. हेमाडपंत ठायी ठायी विश्वास व्यक्त करतात. आमच्याकडे तेवढा विश्वास आहे का? मग कृपा मिळणार कशी?
जीवात्म्याला आदिमातेशी जोडणारी जी रचना आहे, ती रचना म्हणजे सद्‌गुरुतत्त्व.

देव कोपतां गुरू तारी, गुरू कोपतां कोण ? पण तो कधी कोपतच नाही कारण ती "क्षमा" आहे. तिच्या अकरा मुळ नावांमधील एक नाव "क्षमा" आहे हे लक्षात ठेवा. आम्ही कितीही वेळा नाळ कापली तरी ती आई लेकाला सांगते, बाबारे जोड. हजारवेळा तो परमात्मा ही नाळ जोडत असतो. हे जोडण्यासाठीचे सामर्थ्य म्हणजे π.

मनुष्याच्या हृदयातही चार कप्पे आहेत. right atrium मधले अशुद्ध रक्त right ventricle मध्ये जाते तिथून ते रक्त pulmonary artery मधुन फुफ्फुसाकडे जाते तेथून pulmonary vein through aorta मधून सर्व शरीरात पसरते. शुद्ध रक्त heart मधून सर्व शरीरात पसरतं व शरीरातील अशुद्ध रक्त पुन्हा heart मध्ये येतं. हे चक्र आहे. चक्राचा energy force हा circular आहे.

आपण किती वेळा हा विश्वास तोडतो. देव बघत नाही असं कधीच होत नाही. आईला सगळं समजतं. ही जी नाळ आम्ही कापून टाकतो ती जोडण्याचे सामर्थ्य या π ह्या त्रिविक्रमामध्येच आहे. त्यामुळे आपण पापी असो वा पुण्यवान तिच्या गर्भातच असतो. तिला कळत नाही असं काहीच नाही.
लहान बाळ आईने झोडले तरी आईने परत जवळ घेतल्यावरच शांत होते मग हे आम्ही पुढे मोठे झाल्यावर का विसरतो?

आपण frustration नैराश्यात जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा नाळ तुटत नाही पण जेव्हा रागाने मनुष्य स्वत:च्या बुद्धीचा वापर करून असं म्हणतो की हा देव माझ्यासाठी काही करत नाही तेव्हा ही नाळ तुटायला लागते. रक्तवाहिनी कशी आहे? circular आहे. तिचा प्रवाह पण या π या त्रिविक्रमाच्या under आहे. म्हणून आपण आपल्या बाजूने ही नाळ तोडता कामा नये. तुमचं मन एवढं strong नाही की एकदा नाम घेऊन चालत नाही. यासाठी रोज आम्हाला विश्वास उच्चारावा लागतो

"माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते"

हा माझा पूर्ण विश्वास असणे आवश्यक. हे वाक्य आपण सतत लक्षात ठेवायला हवं.
पाठीशी असतां साईसमर्थ, कोणी न शकें लावू हात. हा झाला विश्वास. मग श्रद्धा काय? श्रद्धा म्हणजे प्रेम. नुसतं प्रेम नाही तर हा असाच आहे ह्या भावनेने केलेलं प्रेम. आम्ही कितीही चुकलो तरीही हा आम्हाला कधीच टाकणार नाही ही भावना म्हणजेच श्रद्धा. हा माझा आहे हे प्रेम, आपलेपणा म्हणजे श्रद्धा. यासाठी कधी देवाकडे देवाच्या चेहर्‍याकडे, चरणांकडे बघायला पाहिजे. हा विठ्ठल माझ्यासाठी २८ युगे उभा आहे. आम्हाला कधी वाटतं का ह्याचे पाय दाबावेत. आम्हाला समजलं पाहिजे हा किती कष्ट घेतो, हाच आपल्यावर प्रेम करतो. ह्या आदिमातेचं वात्सल्य माझ्यावर आहेच या विश्वासातून निर्माण होते आपुलकी आणि आपुलकीतून निर्माण होतो विश्वास. आपुलकी म्हणजेच श्रद्धा.

आपलेपणा आपल्याला जपावा लागतो. गुरूक्षेत्रममध्ये ती शस्त्रसज्ज उभी आहे. कोणासाठी? माझ्यासाठी. ह्याच तिच्या नात्यातून निर्माण होतो ’श्री श्वासम्‌’ (तिच्या गर्भनाडीच्या प्रक्रियेतून). तीच सत्ता चालवते. हा π आपल्या जीवनात नीट रहायला पाहिजे. आम्ही काय करतो? circle सुरू केले की एकतर बाहेर जातो किंवा आत जातो. हे असे circle म्हणजे जे देवाने दिले त्याबद्दल आभार न मानता पुढच्याची अपेक्षा करतो. त्यामुळे आमचे circle पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला π चा सिद्धांत लागूच होत नाही.

आषाढी एकादशीला आम्ही उपवास करतो. उपवास म्हणजे काय त्याचे नाव ऐकणे, भजन करणे, आम्हाला वाटले पाहिजे त्याचे पाय चेपले पाहिजेत. हे पादसंवाहन आहे.

आपल्या पाठीच्या मणक्यातील disc ही circular असते. ह्या मणक्यामधुन सुषुम्ना नाडीचा, अंजना मातेच्या प्रभावाचा प्रवास, महाप्राणाचा संचार त्या disc च्या आश्रयाने होतो. कोणासमोर वाकायचे नाही, वाकायचे ते फक्त भगवंतासमोर हा ताठ कण्याचा बाणा फक्त हा π देऊ शकतो.

शरीरातील पेशी या ९०% गोलाकारच आहेत. या पेशींतील nucleus हे circular असते. पेशींचे केंद्र म्हणजे पेशींचा brain हादेखील circular आहे. त्यानंतर DNA आपण पाहतो. ह्यांच्या genes मधुन genes जनुके बनतात. आईवडीलांकडून जे गुण बाळांकडे येतात ते genes through येतात. ह्या DNA मधल्या एका भागाचा दुसर्‍या भागाशी असणारा संबंध हा circular आहे. ह्यावरून आपल्याला कळेल आमच्या शरीरात ह्या π ची action, प्रभाव किती जोरदार आहे.

पौर्णिमेचा चंद्र, सूर्य, पृथ्वी, पाण्याचा थेंब हे सारे गोलच आहेत. शनीचा त्रास होऊ नये म्हणून या ग्रहाभोवती त्रिविक्रमाने तीन कडी घातली आहेत. फक्त उपद्रवी ग्रहालाच त्याने कडी घालून आवळून ठेवले आहे. ही परमेश्वरी रचना आम्हाला समजली पाहिजे. असा हा π त्रिविक्रम आणि त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हात आहे. ही खरी सत्ता आहे. त्या आदिमातेने त्रिविक्रमाला मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न केला, आमच्यासाठी पाठवला आहे.

आम्हाला उपनिषदातून कळले पाहिजे, मी विगत असलो तरी तो परमात्मा माझ्यावर कृपा करण्यास आतुर आहे. उत्तम, मध्यम पहिल्यापासून आहे पण विगत मध्येच येतो. कारण तो खूप weak आहे. तो अख्खी यात्रा चालू शकणार नाही. म्हणून आम्ही कितीही पापी असलो तरीही आपल्याला टाकत नाही. आईचे वचन आहे, जे जे सर्व मध्यम, उत्तम, विगताला मिळाले ते ते सर्व उपनिषद वाचणार्‍याला मिळणार आहे. आणि हे करणारी संस्था म्हणजे π. ह्यासाठी आपल्याकडून ही नाळ तोडली जाणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. हा मला कधीच टाकणार नाही व आईचे वचन "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते" ह्या विश्वासाचा रोज उच्चार करा. आम्ही कितीही विषादात असलो तरीही हा विश्वास व्यक्त करा मग बघा गोष्टी कशा आपोआप बदलतील. आम्ही आईच्या गर्भात आहोत तिथे त्या π चे साम्राज्य आहे.

म्हणूनच हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आमच्या गळ्यात, मनात, बुद्धीत, हृदयात असले पाहिजे. माझी स्मरणशक्ती कमी असली तरी माझ्या सद्गुरूची नाही. ह्या π ची शक्ती आपण बघितली. उपनिषद म्हणजे काय? माझ्या जीवनातल्या क्रिया प्रक्रिया आहेत. हा π बघितल्यावर जाणवेल की उपनिषद म्हणजे माझे जीवन आहे.

हा त्रिविक्रम असा चण्डिकापुत्र, त्याच्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर तो हजारो पटीने प्रेम करतो.
"त्रिविक्रम हा माझ्या जीवनाचा एकमेव संपूर्ण आधार आहे".

॥ हरि ॐ॥
र वर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टद्वारा घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण, बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०१३ ते गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व श्रद्धावान या अमूल्य संधीचा लाभ घेऊ शकतात.
 
परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध बापू नेहमीच आपल्याला सामूहिक उपासनेचे फायदे सांगत असतात. चला तर मग पठणाला जावूया.

पत्ता आणि वेळ खालीलप्रमाणे,

श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, नायगाव, दादर (पूर्व)

हे पठण रोज दोन सत्रात होते. वेळ पुढील प्रमाणे,

सोमवार ते बुधवार व शुक्रवार ते रविवार - सकाळी ९:३० ते १:०० व सायंकाळी ५:३० ते ९:०० वाजेपर्यंत

गुरूवार -  सकाळी ९:३० ते १:०० व सायंकाळी ४:०० ते ७:०० वाजेपर्यंत.

Tuesday 4 June 2013

तुझिया प्रेमे न्हाऊन निघालो ...


"न्हाऊ तुझिया प्रेमे" ह्याचा खरा अर्थ २६ मे २०१३ ला कळला. ह्या प्रेमळ सद्गुरुरायाच्या अप्रतिम भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाबद्दल मी काय बोलणार! पण जसे पिपादादा सांगतात..."गुण ह्याचे अपरंपार मी रे कसा पुरणार, असे कधी म्हणो नये पुरविणे ह्याचा गुण" तेच लक्षात ठेवून मी प्रयास करू इच्छितो.
आद्यपिपा. मिनावैनी, साधनाताई, श्रीकृष्ण शास्त्री इनामदार ह्यांसारख्या श्रेष्ठ भक्तांचे अभंगच अगदी पाषाणाला पाझर फोडू शकणारे आहेत.  त्यातून उच्च प्रतीचे संगीत, एकापेक्षा एक सुंदर गायक ज्यांचे गायन भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले, स्वतः परमात्मात्रयी तिथे उपस्थित ....अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य श्रद्धावान त्या प्रेमयात्रेत देहभान विसरणार नाही असे होवूच शकत नाही.

खरच हा सोहळा अप्रतिम होता. आयुष्यभर जपून ठेवावा असा ठेवा ह्या प्रेमयात्रेत प्रत्येक श्रद्धावानाला मिळाला. त्यासाठी आम्ही खरच अम्बज्ञ आहोत. त्यातून ह्या कार्यक्रमाचे नियोजनही इतके अप्रतिम होते. इतक्या कमी दिवसांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्यांची व्यवस्थित सोय करणे खरच खूप कठीण होते. पण तरीही उत्कृष्ट नियोजनामुळे कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. बसण्याची, खाण्यापिण्याची सोय सुंदर होती. कार्यकर्त्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळत होते. मोठे ग्राउंड, स्टेजची सुंदर मांडणी, अप्रतिम प्रकाश योजना, मोठ्ठे एलसीडिज  ह्यामुळे तर कार्यक्रम भव्यदिव्यच वाटत होता. परमपुज्य बापू, आई, दादांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी व्यवस्थित दिसत होते. कार्यक्रम आधीच सांगितल्याप्रमाणे अगदी वेळेत सुरु झाला आणि वेळेत संपला. खरं सांगू तर कार्यक्रम संपूच नये असेच वाटत होते. घड्याळाचा काटा पुढे सरकूच नये असेच वाटत होते. फेसबुक, पुज्य समीरदादांचा  ब्लॉग. whatsapp  ह्यावरून आधी पासूनच वेगवेगळ्या सुचना मिळत होत्या त्याचा खूप फायदा झाला

मनापासून सांगतो असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत असे वाटते. पुज्य दादांच्या अविरत मेहनतीमुळे आम्हाला हा कार्यक्रम अनुभवायला मिळाला ह्यासाठी आम्ही शतशः अम्बज्ञ आहोत.






Wednesday 15 May 2013

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)
॥ हरि ॐ ॥

श्रीगुरुक्षेत्रम्‌ मन्त्र, अंकुर मन्त्र त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आपण आहोत. हे पद खूप दिवस चालू राहू शकत ह्यात आपल्याला खूप काही शिकायच आहे. पुढच्या आठवड्यापासून मला इथे एक बोर्ड पाहिजे म्हणजे आपली शाळा सुरू झाली. ‘वर’ शद्ब आपण पुराणात वाचतो, ह्याला अमुक वर मिळाला त्याला तमुक वर मिळाला. त्यानंतर पत्रिकेमध्ये ‘वर आणि वधू’ मध्ये वर हा शद्ब आपण पाहतो. वर ब्रह्मर्षी देतात ते जे बोलतात ते खरं होतं. वरदान म्हणजे आपण म्हणतो ‘ह्याच्याकडे जन्मजात संगीताचं वरदान आहे.’ जन्मजात आहे म्हणजेच फार मेहनत करावी लागली नाही. मनुष्याला स्वत:ला काही मेहनत करावी न लागता जे सुंदर भव्यदिव्य मिळत ते वरदान असत. ऋषी तपश्चर्या करतात मग त्यांना वर मिळतो. तर काही ठिकाणी साध्याशा गोष्टींनी देव प्रसन्न होतो आणि वर देऊन जातो, एकाला दहा वर्षे तर एकाला एक दिवस. देव त्याच्या मनाला येईल तसे वागत राहतो. हा देव मोठा लहरी आहे. माझ थोड उशीरा आणि कमी भलं करतो तर इतरांच लवकर आणि जास्त भल करतो, हा देव काही सरळमार्गी नाही. हा मनाला येईल तस वागतो. पण तस कधीच नव्हतं, नसेल, आणि नाहीए.

‘वर’ शद्बाचा मूळ अर्थ मनुष्याच्या मानवी जीवनातील मानवी प्रयासाच्या मर्यादा जिथे संपतात जर ती व्यक्ती श्रद्धावान असेल तर तिथे परमेश्वराच्या सामर्थ्याचं connection आपोआप जोडलं जात. जेव्हा मनुष्याच्या प्रयत्नांमध्ये गुणात्मक जास्त गुणात्मक फरक पडणार नाही असे दिसते, तेव्हा चण्डिकाकुल, परमेश्वर आपोआप connection जोडून त्याला extra ताकद, यश देतात. म्हणजे जर पूर्वी १०० ग्रॅम प्रयत्नांना १० ग्रॅम यश मिळत होत, तिथे १० ग्रॅम प्रयत्नांना १०० ग्रॅम यश मिळते. हे connection केव्हा जोडल जात जोपर्यंत तुम्ही मानवी प्रयास पूर्णपणे मनापासून करता तेव्हा तो भगवंत connection आपोआप जोडतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला वेगळे नियम लावतात. कर्माचा अटळ सिद्धान्त सर्वांना समान असला तरी चण्डिकाकुल व तिचा पुत्र परमात्मा प्रत्येकाला वेगळे नियम लावतात त्यामुळे अनेक problems सुटतात.

नेहमी पहिल्या आलेल्या व्यक्तीला पुढे न्यायचे ठरवले तर काय होईल? बाकीचे कधीतरी पुढच्या वर्गात जातील का? उदाहरण म्हणून मीनावैनी, चौबळ आजोबा ह्यांना जेवढे marks मिळालेत त्यांच्या पटीत mark मिळाले तर तुम्ही वर याल अस असेल तर कोणी पास तरी होईल का? म्हणून प्रत्येकाला तो वेगळे नियम लावतो. प्रत्येक मनुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या कालखंडानुसार वेगवेगळे नियम ती चण्डिका आणि तिचा पुत्र लावतात. फक्त दोनच गोष्टी fix असतात - १) कर्माचा अटळ सिद्धान्त आणि २) पावित्र्य हेच प्रमाण. ह्याला अनुसरुनच ते partiality करतात. ताकद असतानाचे नियम तुम्हाला ताकद नसताना लावले तर, लहानपणीचे नियम वयस्कर झाल्यावर लावले तर घोटाळे होतील. म्हणून स्वत:ची तुलना कधीही दुसर्‍याशी करू नका. परमेश्वराची कृपा दुसर्‍यावर किती झाली आणि माझ्यावर किती झाली ह्याची तुलना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ज्याला हिरा खरा का खोटा माहित नाही तो हिर्‍याची तुलना कशी करणार. आम्ही परमेश्वराची कृपा बघितली नाही. परमेश्वर बघण लांब राहिल तो अनंत आहे त्याला समजून घेण शक्यच नाही. आम्ही लहान आहोत म्हणून परमेश्वराला आम्ही कसे जाणून घेणार. तर परमात्म्याची कृपा आमच्या आयुष्यात कुठे कुठे आली ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आपल्याला कळायला लागल्यापासून आमच्या जीवनात किती सुंदर गोष्टी घडल्या हे आठवलं की आपोआप आम्हांला परमेश्वराची कृपा नीट समजू शकते. ह्याला योगायोग मानू नका. ह्या जगात योगायोग नसतो. कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते. संकट येऊन गेल्यावर बापरे ! सुटलो - आठवा. परमात्म्याची कृपा कशी होते हे बघण्यासाठी दुसर्‍यांच जीवन बघण्याची, मूर्तीकडे बघण्याची, मोठमोठे धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या. माझ्या जीवनात मी चुकीचे वागत असताना पण परमेश्वराने किती मला भरभरून दिले हे आठवा.

पण मनुष्याचा मोठा problem हा आहे की त्याच्या स्मृती केन्द्रात जे मिळालं नाही, दु:ख प्रसंगाची नोंद जोरदार असतात. परमात्म्याने स्मृती दोन्ही गोष्टींची समानच दिलेली आहे. सुख म्हणजे काय तर आम्हाला मिळालेल सुख भागिले आमची सुखाची अपेक्षा. आमची सुखाची अपेक्षा अनंत असते. दु:ख म्हणजे काय तर आम्हाला असलेलं दु:ख भागिले दु:खाची अपेक्षा म्हणून दु:ख increase होत राहतं. मिळालेल्या सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. मिळालेल्या सुखाचा आनन्द आम्हाला परत-परत उपभोगता आला पाहिजे. मनुष्य नेहमी दु:ख परत परत जगत असतो.

मृत व्यक्तीच्या आठवणी परत परत येतात. पण ssc पास झालो कि त्याचा आनंद परत साजरा करत नाही. Degree मिळाल्याचा आनंद नोकरी मिळविण्यात हरवून जातो. लग्नाचा प्रसंग आठवत नाही, पण नवर्‍याला बायको काय बोलली आणि बायकोला नवरा काय बोलला हे चांगल आठवतं. आईचे धपाटे आठवतात पण तिचं रात्रभर जागण आठवत नाही. जो पर्यंत ती गोष्ट असते तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत नाही. ह्या जगातील पहिली मूर्ती कशी घडली रेणूकामातेची घडली. आईवर निस्सिम प्रेम करणारा परशूराम पित्याच्या आणि मातेच्या देहाभोवती काष्ट रचलेली, अग्नी दिलाय ज्याक्षणी मातेचं मुख दिसल नाही तेव्हा त्याने दत्तात्रेयांकडे विनंती केली की एकदा मला माझ्या मातेला पाहायच आहे. आईला पाहून परमात्मा असणारा परशूराम धावत आईजवळ गेला. त्याने आईला स्पर्श करताच फक्त तिचं मुख राहिल त्यातूनच ही मूर्ती घडली. ह्या विश्वातील पहिली मूर्ती परमात्म्याच्या मातेच्या विरहामुळे घडली. आई-वडिल गेले की आम्ही रडतो.

शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मुलांना मारून मुकटून आपण पाठवतो. हल्ली मुलांचे बालपण निघून गेलयं. तारुण्यात तारुण्याची शक्ती नुसती उधळली जाते. शरीर थकलं की माझं तारुण्य फुकट घालवलं म्हणून दु:ख करतो. ह्या प्रवृत्तीमुळे माणसाच्या स्मरणशक्तीत वेदनेची तीव्रता जास्त असते. वेदना खोलवर जाते. जे दु:ख आहे ते आहे. पण ह्याची माझी अपेक्षा शून्य नाही झाली तरी माझा सद्‍गुरु माझ्या दु:खापेक्षा मोठा आहे. मिळालेलं सुख पुढच्या वटवृक्षा एवढ्या सुखाचे बीज आहे हे लक्षात ठेवा. आपल्या स्मरणशक्तीला आपल्याला training द्यावं लागत. दुसर्‍याने केलेला अपमान पटकन आठवतो पण मान आठवत नाही. इथे चण्डिकाकुलाकडून मिळणारा वर आवश्यक असतो.

तिने रामाला वर दिला. तिच्यासाठी प्रत्येकाला नियम वेगळा आहे. ती रामाचे नियम तुम्हाला लावत नाही. चण्डिका आणि तिचे पुत्र माणसांशी युद्ध करत नाहीत त्यांच युद्ध असुरांशी असत. हेच आपल्याला मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषद्‌ शिकवत. हे चण्डिकाकुल असूरांशी परिक्षा घेत मनुष्यांची परिक्षा घेत नाही.

एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ।

हा विश्वास मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषदाने दिला आहे. मनुष्याच्या चुकांमुळे वृत्रासूर उत्पन्न होतो. जो मनुष्य वाईट वागतो तो वृत्रासुराच्या प्रभावाखाली गेलेला आहे.

जो नियम ती रामाला लावते ती तो नियम आम्हाला लावणार नाही. त्यामुळे ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं नाही. आम्हाला प्रपंच प्रेमाने करायचा आहे त्याबरोबर परमार्थातही प्रगती करायची आहे. माझ्या भावाचा, शत्रुचा नियम ती मला लावत नाही. म्हणून श्रद्धावानाच्या शत्रुचा पराजय होऊ शकतो. पण आमची अपेक्षा असते तिने जेव्हा आम्हाला पाहिजे तसे नियम तिने आम्हाला लावावेत. पण आम्हाला अक्कल किती? तिचे नियम कुठले ते माहित नाही. ती कृपा कशी करते? वातावरणात बदल कसे घडतात हे माहित नसतं. एखाद्या मोठ्या अपघातून मनुष्य वाचतो कसा? हे त्याचं काम आहे, हे तोच करू शकतो आणि त्यासाठी त्याठिकाणी धावत जायची गरज नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. खेळ समजण्यासाठी खेळ बघावा लागतो, त्याचे नियम समजून घ्यावे लागतात. पण त्याचा खेळ बघणार कुठे कुठे? मग समजून कसा घेणार? डॉक्टर सांगतात ह्या मनुष्याच्या जीवनाचे दोन तास उरलेत तो मनुष्य दहा वर्ष संसार करतोय. ही परमात्म्याची लीला आहे. म्हणून शांतपणे एकच गोष्ट करायची, तिने सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं -

"माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते."

तुमच्यासाठी ती चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा परशूराम पण हे वाक्य उच्चारतो. म्हणजे रामासाठी फक्त एक चण्डिका आईच हे वाक्य उच्चारते. श्रद्धावानासाठी ती चण्डिकाही हे वाक्य उच्चारते आणि परशूरामही सगळ्या श्रद्धावानांच्या कानात सांगतो. आम्ही अवतारांपेक्षा डबल भाग्यवान आहोत म्हणून लक्षात ठेवा सामान्य श्रद्धावान भक्ताकडे अवताराच्या दुप्पट ताकद असते. तुमच्यासाठी चण्डिका आई आणि परमात्मा दोघेही वचन देतात. त्याच्याजवळ एक वरदान आहे तुम्हाला दोन वरदान आहेत.

तुम के प्रेमु राम के दुना

जन्मत: चण्डिकाआईच एक वरदान आहे - "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते" ज्याक्षणी देवयान पंथावर प्रवास सुरु करतो तेव्हा परमात्मा आमच्यासाठी उच्चारतो. ही दोन वरदान तिनेच दिली आहेत. तिने कानात सांगितलीत, परशुराम आम्हाला ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल बापू आमच्यासाठी काय आकाशवाणी होणार का? आकाशावाणी कोणासाठी होते - कंसासाठी तुम्ही काय कंस आहात का? त्यापेक्षा प्रेमवाणीचा स्विकार करा. आम्ही हे वाक्य कोणाच्या तोंडून ऐकलय ते लक्षात ठेवा. आम्ही हे वाक्य ऐकलयं हेही आठवत नसेल तरी काही नाही. कारण वासरू रस्ता चुकलं तरी गाय चुकत नाही. शिष्याला एकदा आपल म्हटल त्याचा मार्ग नरकात जाणारा असेल तरी हा नरकात जायला तयार असतो. आम्हाला नरक नाही हे आम्हाला माहित पाहिजे. कारण -

जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥

आमचा रस्ता नरकाकडे जरी जात असला तरी तिथे साई येऊन उभा राहिल. आणि जिथे साई उभा आहे तिथे नरक असूच शकत नाही. आम्हाला जी प्रारब्धाच्या नियतीची भिती दासी आहे ती नियती चण्डिकेची यत्किंचित दासी आहे.

जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥

हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आज तुम्हाला decleare करतो जे अग्रलेख नीट वाचतात त्यांना आठवते का ते बघा तो देवीसिंह पाठीवर स्कंदचिन्ह घेऊन फिरतो. तिथेच एक शद्ब येतो श्वास शद्ब होता. ‘श्रीश्वास’ हा शद्ब नीट लक्षात ठेवा. हा आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे सहजतेने, प्रेमाने आणि पूर्णपणे कसा? त्याच्याविषयी मला माहित नाही. जेव्हा मला माझी आई सांगेल की आता ‘श्रीश्वास’ सगळ्यांना द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी declare करेन, पण त्यासाठी तिने मान हलवली पाहिजे.

॥हरि ॐ॥