तुझिया प्रेमे न्हाऊन निघालो ...
"न्हाऊ तुझिया प्रेमे" ह्याचा खरा अर्थ २६ मे २०१३ ला कळला. ह्या प्रेमळ सद्गुरुरायाच्या अप्रतिम भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाबद्दल मी काय बोलणार! पण जसे पिपादादा सांगतात..."गुण ह्याचे अपरंपार मी रे कसा पुरणार, असे कधी म्हणो नये पुरविणे ह्याचा गुण" तेच लक्षात ठेवून मी प्रयास करू इच्छितो.
आद्यपिपा. मिनावैनी, साधनाताई, श्रीकृष्ण शास्त्री इनामदार ह्यांसारख्या श्रेष्ठ भक्तांचे अभंगच अगदी पाषाणाला पाझर फोडू शकणारे आहेत. त्यातून उच्च प्रतीचे संगीत, एकापेक्षा एक सुंदर गायक ज्यांचे गायन भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले, स्वतः परमात्मात्रयी तिथे उपस्थित ....अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य श्रद्धावान त्या प्रेमयात्रेत देहभान विसरणार नाही असे होवूच शकत नाही.
खरच हा सोहळा अप्रतिम होता. आयुष्यभर जपून ठेवावा असा ठेवा ह्या प्रेमयात्रेत प्रत्येक श्रद्धावानाला मिळाला. त्यासाठी आम्ही खरच अम्बज्ञ आहोत. त्यातून ह्या कार्यक्रमाचे नियोजनही इतके अप्रतिम होते. इतक्या कमी दिवसांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्यांची व्यवस्थित सोय करणे खरच खूप कठीण होते. पण तरीही उत्कृष्ट नियोजनामुळे कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. बसण्याची, खाण्यापिण्याची सोय सुंदर होती. कार्यकर्त्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळत होते. मोठे ग्राउंड, स्टेजची सुंदर मांडणी, अप्रतिम प्रकाश योजना, मोठ्ठे एलसीडिज ह्यामुळे तर कार्यक्रम भव्यदिव्यच वाटत होता. परमपुज्य बापू, आई, दादांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी व्यवस्थित दिसत होते. कार्यक्रम आधीच सांगितल्याप्रमाणे अगदी वेळेत सुरु झाला आणि वेळेत संपला. खरं सांगू तर कार्यक्रम संपूच नये असेच वाटत होते. घड्याळाचा काटा पुढे सरकूच नये असेच वाटत होते. फेसबुक, पुज्य समीरदादांचा ब्लॉग. whatsapp ह्यावरून आधी पासूनच वेगवेगळ्या सुचना मिळत होत्या त्याचा खूप फायदा झाला
मनापासून सांगतो असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत असे वाटते. पुज्य दादांच्या अविरत मेहनतीमुळे आम्हाला हा कार्यक्रम अनुभवायला मिळाला ह्यासाठी आम्ही शतशः अम्बज्ञ आहोत.
No comments:
Post a Comment