Tuesday 14 May 2013



न्हाऊ तुझिया प्रेमे.....


आषाढी एकादशी  असो वा कार्तिकी एकादशी, पंढरपुरात भक्तिभावाने भारलेल्या वारकर्यांचा सागर उसळलेला असतो. असाच सागर आपल्याला पहायला मिळणार आहे २६ मे २०१३ ला पद्मश्री डी. वाय. पाटील स्टेडीयमवर....

परम पुज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भक्ती प्रेमामध्ये "अवघे न्हाउन" निघण्यास आतुर असणाऱ्या श्रद्धावानांचा सागर तिथे ओसंडून वाहताना दिसेल. औचित्यच तसे आहे... पिपादादा, साधनाताई, मीनावहिनी, श्रीकृष्ण शास्त्री इनामदार अश्या अनेक भक्तश्रेष्ठांनी रचलेल्या अभंग-गजरांचा भक्तिमय कार्यक्रम ह्यादिवशी तिथे संपन्न होणार आहे. तुम्ही बहुतेकांनी ह्यासाठी नाव नोंदवले असेलच पण तरीही कुणी अजून बाकी असेल तर हि सुवर्णसंधी दवडू नका.


आद्य पिपा म्हणतात त्याप्रमाणे "धावा हो सत्वर तुम्ही धावा हो सत्वर, उभाची तत्पर, बापू उभाचि तत्पर", अशीच काहीशी परिस्थिती आहे. अभी नही तो कभी नही....मित्रांनो.

"दोन्ही हात पसरुनी" आपला बापुराया त्यादिवशी त्याच्या प्रेममय बाहुपाशात सामावून घेण्यास तत्पर असेल.तर मग काय, तयारी करुया ना त्याचे प्रेम लुटण्याची आणि आपले "मीपण" लुटून घेण्याची.

चला मग जाउया "नारदाच्या गावाला" २६ मे ला....

1 comment:

  1. श्री राम, खरच आता प्रत्येक श्रद्धावान 26 मे ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    ReplyDelete